…तर पवारांची औलाद सांगणार नाही – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन. नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही. अस वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील ‘हल्लाबोल’ यात्रेदरम्यान उस्मानाबाद येथील भूम ,अधे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

‘या सरकारने अजूनपर्यंत कर्जमाफी दिलेली नाही. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी पहिल्यांदाच संपावर गेला. या सरकारचे प्रतिनिधी कर्जमाफी करण्यासंदर्भात पवार साहेबांचा सल्ला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा असे सांगितले होते. मात्र, त्यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल केले. हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करताना दिसत आहे.’ असा आरोप सुद्धा अजित पवार यांनी केला.

‘आज कुठल्याही निवडणुका नाहीत परंतु आपण एकत्र आलो आहोत. आपला शेतकरी मोडला तर राज्य उद्ध्वस्त होईल. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे.’ असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

You might also like
Comments
Loading...