निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवस्मारकाचे भूमीपूजन : अजित पवार

Ajit pawar on Election Results

“राज्यात महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अरबी समुद्रात भूमिपूजन करण्याचा प्रयत्न असून, भूमीपूजनाव्यतिरिक्त भाजप-शिवसेना सरकार काहीही करत नसून जाहिरातीवर मात्र अनाठायी खर्च करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलचे भूमीपूजन झाले असताना, अजून त्याठिकाणी एक खड्डादेखील यांनी खोदला नाही, तर याबाबत आजून ठोस निर्णय या सरकारने केलेला नाही. केवळ निवडणुका डोळयासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला आहे.”, अशी टीका अजित पवार यांनी केली.