मेंदूला सारखं सांगतो, कुठलाच चुकीचा शब्द जाऊ देऊ नकोस : अजित पवार

मी सारखं माझ्या मेंदूला सांगत असतो की, ये शहाण्या दुसऱ्या मेंदूला कुठलाच शब्द चुकीचा जाऊ देऊ नकोस. कारण मानवाला दोन मेंदू असतात”, असे म्हणत अजित पवार म्हणाले. “आपण बोलताना भान ठेवावं, असा सल्ला अजित पवार यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांना दिला. तर, मीही बोलताना आता खूप काळजीपूर्वक बोलत असल्याचेही अजित पवारांनी आवर्जून सांगितले.

…म्हणून पंतप्रधान मोदींना समाजात काय चाललंय, हे कळत नाही : अजित पवार

“समाजात काय चाललं आहे, हे एखाद्या नेत्याला कळण्यासाठी त्याला घर-प्रपंच असणं गरजेचे असतं. घरची लोक त्या नेत्याच्या बाबतीत समाजात काय बोलतात, हे घरी आल्यावर स्पष्ट सांगतात. मात्र, देशाच्या पंतप्रधानांना संसार-प्रपंचच नसल्याने, त्यांना समाजात काय चाललंय हे  काय समजतच नाही.”, असे म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदीबाबत टीका केली.

बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीत  राष्ट्रवादीच्या दोन माजी नगराध्यक्षांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात धक्का बसला होता. “निवडणुकीच्या वेळेस काहींना फाजील आत्मविश्वास नडला”, असे म्हणत अजित पवारांनी अनेकांना टोले लगावले.