सरकारला १०० दिवस पूर्ण झाले तरी ‘हा’ काय करतोय बाबा कुणास ठाऊक – अजित पवार

blank

टीम महाराष्ट्र देशा –  शासकीय बंगला खाली न करणाऱ्या माजी मंत्र्याला टोला लगावत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘नवीन सरकार स्थापन होऊन जवळपास १०० दिवस पूर्ण झाले तरी हा बुवा अजून काय करतोय बाबा कुणास ठाऊक.’

‘जेव्हा बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्तानं मुंबईत येतात. त्यावेळी मी नाराज होतो. मुंबईतलं घर लहान आहे. सरकार स्थापनेला जवळपास १०० दिवस पूर्ण होत आले तरी अद्याप शासकीय बंगला रिकामा झालेला नाही’, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. आज  बारामतीत साखर कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवारबोलत होते.

‘बारामतीकर मुंबईत आल्यावर आपण नाराज होत असतो. मुळात आताच घर लहान आहे. येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरुममध्ये बसवावं लागतं. आता तर माझ्या बेडरुममध्ये लोकांना बसवायचं राहिलंय’ असंही अजित पवार म्हणाले.

त्यामुळे अजित दादांच्या या मार्मिक टोल्यानंतर तरी बंगला न सोडणारा हा माजी मंत्री शासकीय बंगला सोडणार का ? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही पहा –