घरप्रपंच नसल्याने मोदींना समाजात काय चाललंय हे कळत नाही: अजित पवार

समाजात काय चालू आहे हे कळण्यासाठी नेत्याला घरप्रपंच असणे गरजेचे असते. समाजात लोक त्या नेत्याविषयी काय बोलतात हे घरची लोक सांगू शकतात. पण देशाच्या पंतप्रधानांना घर प्रपंचच नसल्याने त्यांना समाजात काय चालू आहे हेच कळत नाही असे सांगत अजित पवार यांनी मोदींवर टीका केली.

‘मी हल्ली माझ्या मेंदूला सारखं सांगत असतो की चुकीचा शब्द जाऊ देऊ नको. मी बोलताना काळजीपूर्वक बोलतो. आपणदेखील बोलताना भान ठेवावे’ असे उपदेश त्यांनी नगरसेवकांना दिले. ‘निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ४ जागा सुटल्या. नाहीतर विरोधक भुईसपाट झाले असते. पण यातून शिकण्यासारखे आहे, ज्या त्रुटी राहिल्या त्यावर आपण काम करु’ असे त्यांनी सांगितले.

बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन माजी नगराध्यांचा पराभव झाला. यावर पवार म्हणाले, निवडणुकीच्या वेळेस काही लोकांना अतिआत्मविश्वास नडला. शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरुनही अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवस्मारकाचे भूमिपूजन केले जात आहे. भूमिपूजनाव्यतिरिक्त भाजप काहीच करत नाही. इंदू मिलमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले. पण त्यानंतर तिथे एक खड्डाही खोदला नाही असे त्यांनी सांगितले. भाजप सरकार जाहिरातबाजीवर अनाठायी खर्च करत आहे अशी टीका त्यांनी केली.

You might also like
Comments
Loading...