‘जोपर्यंत हाडाचा कार्यकर्ता माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कुणाच्या बापाला घाबरत नाही’ -अजित पवार

पिंपरी-चिंचवड: ‘जोपर्यंत हाडाचा कार्यकर्ता माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कुणाच्या बापाला घाबरत नाही.’ असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांना इशारा दिला आहे. ते आज पिंपरीमध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

 

एकीकडे अजित पवार दमदाटीची भाषा करत असले तरीही त्यांनी याच सभेमध्ये कानाला खडाही लावला आहे. ‘एकदा माझी जीभ घसरली आता मात्र प्रत्येक शब्द तोलून मापून बोलतो.’ असं सांगालयाही अजित पवार विसरले नाहीत.

 

 

“मी काय साधू संत नाही. घशाला कोरड पडेपर्यंत मी बोलतो. ना चहा, ना पाणी. प्रवचन, कीर्तन करणारे पाकीट तरी घेऊन जातात. मला कुठं काय मिळतंय? जनतेकडं लक्ष द्यायचं असेल तर त्यांनी घडाळ्यासमोरील बटन दाबावं तेंव्हा मी लक्ष घालेन ना?” असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं.