‘जर कोणी घोषणाबाजी केली तर तिकीट देणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची लगबग वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा सुरु असताना इच्छुक उमेदवारांनी शक्ती-प्रदर्शन केलं. या उमेदवारांच्या उतावळ्या कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्याला तिकीट मिळावं म्हणून घोषणाबाजी सुरू ठेवली. पण यावेळी अजित पवार संतापले, आता जर कोणी घोषणाबाजी केली तर तिकीट देणारचं नाही नाही अस विधान केले.

समोर बसलेला कार्यकर्ता आमच्यासोबत आहे, त्यामुळे आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी मध्यंतरी व्यस्त असल्याने पिंपरी चिंचवड शहरात येऊ शकलो नाही. तर बातम्या आल्या अजित दादा शहरवासियांना विसरले. मी मरेपर्यंत विसरणार नाही. मी कधीही येईन, कधीही जाईन हे आमचं आम्ही ठरवू, कार्यकर्ते आणि आमच्यात कोणी ढवळा-ढवळ करू नये असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, पक्षांतरावर भाष्य करताना ‘ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. पण आपले सरकार आल्यावर त्यांना आपल्याकडे घ्या असं तुम्ही म्हणू नका. मी तर कुणाला परत पक्षात घेणार नाही. पण तुम्ही येऊन सांगू नका, दादा घ्या हो पदरात पाडून. अरे आपला पदर फाटला, पदरात पाडून घेता-घेता असं विधान केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...

Loading...