fbpx

अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय! सुप्रियाताई सुळेंचे नागरिकांना आवाहन

supriya sule

पुणे: हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी हल्लाबोल यात्रेचा माध्यमातून सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. आगामी निवडणुकांची तयारी म्हणून राष्ट्रवादीचे नेते जोमाने तयारीला भिडले आहेत. दरम्यान, शिरूर येथील सभेत बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अजित दादांना मुख्यमंत्री बनवण्याचे असे, आवाहन उपस्थीत नागरिकांना केले.

सुप्रियाताई म्हणाल्या, अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय हे लक्षात ठेवा. सभेला बसून आणि भाषणे ऐकून हे साध्य होणार नाही. त्यासाठी त्येक माणसाला "राष्ट्रवादी’ विचार पटवून सांगा. तसेच जोपर्यत शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नाही, त्यांचे कर्ज माफ होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकऱ्यांसाठी लढत राहील. पवार साहेब मुख्यमंत्री असताना जी राज्याची आन-बान-शान होती ती पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाला सत्ता द्या! असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

ताई पुढे म्हणाल्या, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, पवार साहेब यांच्या विचारसरणीवर प्रेम करणारी लोकं तुम्ही आहात. राजकीय, सामाजिक, सांप्रदायिक दृष्ट्या पावन झालेली ही भूमी आहे. त्यामुळे या मातीत मी एक वेगळ्या अपेक्षेने येते. लोकसभेत आणि विधानसभेतही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावं यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचाचा पाठिंबा आहे. या भागातून राष्ट्रवादीचा महिला लोकसभेत निवडून आली तर मला आनंद होईल.

1 Comment

Click here to post a comment