VIDEO- सहकार कुणी बुडवला याबाबत अजित पवारांनी आत्मचिंतन करावे- सुभाष देशमुख

पुणे: हल्लाबोल यात्रेदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अग्निशामक दलासाठी जी जागा राखीव ठेवली होती. तिथे अनधिकृतरित्या बंगला बांधून सहकारमंत्री सुभाष देशमुख आता झोपा काढत आहेत. त्यांनी या जिल्ह्याचे वाटोळे केले. अशी, टीका केली होती. त्याला सुभाष देशमुख यांनी ‘महाराष्ट्र देशा’ सोबत बोलतांना पलटवार केला. माझा बंगला अधिकृत असून गरज पडल्यास अजित पवारांना कागदपत्रे दाखवू शकतो असं देशमुख म्हणाले. याशिवाय सहकार क्षेत्र कोणी बुडवले याचे अजित पवारांनी आत्मचिंतन करावे असा सल्लाही त्यांनी दिला.

काय म्हणाले सुभाष देशमुख ?

सहकार क्षेत्र कोणी बुडवले याचे अजित पवारांनी आत्मचिंतन करावे. राज्यातील अनेक साखर कारखाने, सहकारी संस्था राष्ट्रवादी – काँग्रेसने बंद पाडल्या. तसेच माझा बंगला अधिकृत असून वाटल्यास अजित पवारांना कागदपत्रे दाखवू शकतो. जर मी जिल्ह्याचे वाटोळे केले असेल तर राज्यातील ३७ साखर कारखाने कोणाच्या काळात विकले ? तसेच राज्यातील २२ हजार संस्थेपैकी ११ हजार संस्था कोणी बुडवल्या ? याचे उत्तर विरोधकांनी द्यावं.

काय म्हणाले होते अजित पवार ?

सरकारने पश्चिम महाराष्ट्राचे सर्वात मोठे नुकसान केले आहे. तसेच अग्निशामक दलासाठी जी जागा राखीव ठेवली होती. तिथे अनधिकृतरित्या बंगला बांधून सहकारमंत्री सुभाष देशमुख आता झोपा काढत आहेत. त्यांनी या जिल्ह्याचे वाटोळे केले. सरकारने सर्वात मोठे नुकसान पश्चिम महाराष्ट्राचे केले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळायला हव्यात याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. हे सरकार काम तर करत नाही पण लोकांना बदनाम करण्याची एकही संधी सोडत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.Loading…
Loading...