आगामी निवडणूकीत नवीन चेहऱ्याला संधी देवू : अजित पवार

पिंपरी : काळानुरूप बदल होतच असतात. यामुळे आगामी निवडणूकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल. तसेच पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी ते पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, यावेळी बोलताना पवार यांनी भाजपवर देखील टीका केली. पारदर्शक कारभाराची हमी देत भाजप महापालिकेत सत्तेवर आले. ठेकेदारांमधील रिंग आणि निविदा प्रक्रियेशिवाय मर्जीतील ठेकेदारांना काम दिल्यामुळे पारदर्शकतेचे बुरखा फाटल्याचे पवार यांनी सांगितले.