बारामती : विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राज्यात अतिवृष्टी झाल्यापासून ॲक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी काल नागपूरमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. त्यांनतर शिंदे-फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
“आज एक महिना उलटून गेला तरी देखील मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंच राज्याचा कारभार करत आहेत. त्यामुळे कितीही म्हटलं तरी विकासकामं ठप्प झाली आहेत. आता तर त्यांच्यावर इतका भार आलेला आहे की मुख्यमंत्री आजारी पडत आहेत. कुणीच आजारी पडू नये. मी चांगल्या भावनेनं बोलतोय, मी राजकारण करत नाहीये किंवा टीका टिप्पणी करत नाहीये. पण जर तुम्ही बाकीच्या 40-42 लोकांचं मंत्रिमंडळ केलं असतं, तर कामाची वाटणी झाली असती. जो तो पालकमंत्री ज्याच्या त्याच्या जिल्ह्यात काम करत राहिला असता. अशा प्रकारची संकट आल्यावर आढावा बैठका झाल्या असत्या. त्यामुळे लोकांचे नक्की काय प्रश्न आहेत, ते समजून घेता आलं असतं. कारण सचिवांना सांगितलं तर ते म्हणतात आम्हाला आदेश पाहिजेत. पण ते आदेश देण्यासाठी त्या खात्याचे मंत्रीच नाहीत. सगळीच जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे”, असं अजित पवार आजच्या भाषणात म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार करायला घाबरताय का?
आज सकाळी माध्यमांशी बोलताना पवार अजित पवार म्हणाले, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे. कारण पावसाळी अधिवेशन नेहमी जुलैमध्ये घेतलं जातं. पण आता जुलै महिना संपला ऑगस्ट सुरु झाला. एक महिना होऊन गेला, तरीही यांना मुहूर्त मिळेना कि कुठून ग्रीन सिग्नल मिळेना, यांची एकवाक्यता होईना. का घाबरतायेत मंत्रिमंडळ विस्तार करायला काय कळत नाहीये. राज्यातील १३ कोटी जनता आशेने पाहत आहे. आताही मी लोकांना भेटलो त्यांचे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत. ते त्या त्या मंत्र्यांना सांगणं गरजेचं आहे, त्यासाठी त्वरित मंत्रिमंडळ स्थापन झालं पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या:
- Nana Patole । दडपशाहीने आंदोलन चिघळण्याचा भाजप प्रयत्न करतंय; नाना पटोलेंचा आरोप
- Pravin Draekar | भाजपचे प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
- 5G Internet and Smartphones | 5G इंटरनेट होतंय लॉंच; पहा कोणते आहेत पॉकेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन्स
- Rahul Narvekar । “पिठासीन अधिकारी म्हणून… “; शिंदे – ठाकरे यांच्यातील संघर्षावर नार्वेकरांच मोठं विधान
- Ravindra Jadeja | CSK वर रवींद्र जडेजाची नाराजी वाढली? इन्स्टा पोस्टनंतर ट्विट हटवले
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<