अजित पवारांनी फिरवली धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमाकडे पाठ !

परळी: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे आयोजित कार्यक्रमाला पाठ फिरवली. मुंडे यांनी आयोजित परळी तालुक्यातील खासगी कंपनीच्या सौरउर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला अजित पवार न आल्याले राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.

धनंजय मुंडे यांनी गुरुवारी या पूर्वनियोजित प्रकल्पाच्या लोकार्पणाची जय्यत तयारी केली होती. कार्यक्रमाला अजित पावर येणार असल्याचे जाहीर केले होते. तशी पत्रिकाही छापण्यात आली होती.

अजित पवार कार्यक्रमाला न आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसले. अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबतचे निश्चित कारण पक्षांकडून सांगण्यात न आल्याने, धनंजय मुंडे यांनीच या कार्यक्रमाचे लोकार्पण उरकून घेतले. या कार्यक्रमास अजित पवारांनी अनुपस्थिती दाखवल्यामुळे संपूर्ण बीड जिल्हात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

यापूर्वी इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलतांना अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची खिल्ली उडवली होती. “तुम्हाला इथली अंडी पिल्ल माहित आहेत. धनंजय अलीकडेच राष्ट्रवादीमय झाला. त्यामुळे त्याला आपल्यामध्ये मिसळायला थोडा वेळ लागेल. पण त्याला अंडी पिल्ल माहिती नाहीत. त्याला गाय माहिती आहे. तिची सड माहित आहे. आणि दुध काढायचं माहित आहे”. असे पवार म्हणाले. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधान आले होते.

You might also like
Comments
Loading...