पुणे: सध्या वाईनसंबंधी निर्णयावरून राज्यात चांगलेच राजकारण रंगले आहे. राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीचा (Wine Sale) प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्णयानुसार वाईन आता जनरल स्टोअर तसेच सुपर मार्केटमध्ये (Wine sales in supermarkets)देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. राज्यसरकारच्या या निर्णयावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
“वाईन आणि दारू यात जमीन असमानाचा फरक आहे. वाईन ही फळांपासून बनत असते. अनेक वर्ष आपल्या राज्यातील शेतकरी अशा फळांची पिके घेतात. काजू, द्राक्ष यापासून वाईन तयार केली जाते. या फळांची पिके आपल्या राज्यातील शेतकरी घेत असतात. अशी अनेक प्रकारची फळे आहेत, ज्यापासून वाईन तयार केली जाते. मात्र काहींकडून जाणीवपूर्वक ‘मद्यराष्ट्र’ अशी महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे.”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी अजित पवारांनी मध्य प्रदेश सरकारचाही संदर्भ दिला आहे. मध्यप्रदेश सरकारने तर घरपोच सुविधा देण्याचा निर्णय घेतला. मात्र काही लोकांनी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वाईन आणि दारू यामधील फरक समजून घ्यावा, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “गाजर पार्टीच्या कोलांटउड्या पाहून गांडूळ सुद्धा लाजत असेल”, रुपाली पाटलांचा टोला
- पुण्यातील शाळा-कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु; उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- “मास्क सक्तीपासून मुक्ती मिळेल हा गैरसमज”, आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
- भाजप ठरला देशातील सर्वात श्रीमंत पक्ष तर दुसऱ्या क्रमांकावर बसपा
- U-19 WC : पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाची उपांत्यफेरीत धडक