आमच्या फॅमिलीचं काय घ्यायचंय तुम्हाला,अजित पवारांचं मोदींना उत्तर

टीम महारष्ट्र देशा : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका केली होती. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गृहकलह सुरु असून अजित पवार यांनी शरद पवार यांना हिटविकेट केलं आहे, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला होता. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे .

आमच्या फॅमिलीचं काय घ्यायचंय तुम्हाला, तुमच्या फॅमिलीचं काय ते बोला पंतप्रधानांनी देशाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे. महागाई , बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर बोलण्यापेक्षा पवार फॅमिली बद्दल बोलण्याची काही गरज नव्हती, अशा शब्दात अजित पवारांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर दिले आहे.

वर्ध्याच्या सभेत मोदींनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीला कुंभकर्णाची उपमा देत टीका केली होती.