गांडुळाची उपमा त्यांना इतकी लागली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेला मी दिलेली गांडुळाची उपमा त्यांना इतकी लागली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलंय, आता त्यांचं खरं, की माझं, याचा निर्णय जनताच घेईल, अस म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेने सामना मधून केलेल्या टीकेला उत्तर दिल आहे.

स्वतःचं अपयश झाकण्यासाठी आणि अजित पवार यांनी शिवसेनेचं खरं स्वरुप उघड केल्यामुळे शिवसेनेचा तीळपापड झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे सरकारला नालायक म्हणतात, पण याच सरकारमध्ये शिवसेनेचे 12 मंत्री आहेत, हाच शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे, असंही तटकरे म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांनी जे कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीतच गमावले. त्यामुळेच ७५ व्या वर्षातसुद्धा पक्षबांधणीसाठी पवारांना वणवण करावी लागत असल्याची टीका, सामनातून अजित पवार यांच्यावर करण्यात आली आहे. आम्हाला गांडूळ म्हणणाऱ्यांना दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. म्हणून तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असंच म्हणावं लागेल, अशी विखारी टीका सुद्धा अजित पवार यांच्यावर सामना मधून करण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...