मुंबई : परशुराम जयंतीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलत असतांना भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मी ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असे वक्तव्य केले आहे. रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार म्हणाले की,‘राज्यात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणणे योग्य नाही. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतात. यात काहीच हरकत नाही. मात्र जे कोणी १४५ चा बहुमताचा आकडा जमवू शकतील त्यांचा मुख्यमंत्री असेल,’असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, ‘नेतृत्व हे समाजाला एकसंघ ठेवणारं असलं पाहिजे. त्यामुळे ब्राम्हणाला मी केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेलं पाहू इच्छित नाही. तर या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो’, असे रावसाहेब दानवे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “मी ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो”, रावसाहेब दानवे यांचे मोठे वक्तव्य
- “शिवसेना कोणालाही पाठिशी घालत नाही मग तो…”, ‘त्या’ प्रकरणावरून शितल शेठ यांचा केशव उपाध्येंना टोला
- नॉट रिचेबल असलेले साईनाथ बाबर अखेर आले समोर!
- IPL 2022 CSK vs RCB : किती भारी ना..! लाइव्ह मॅचमध्ये मुलीनं केलं आपल्या बॉयफ्रेंडला प्रपोज; पाहा VIDEO!
- “कोरोनानंतर आता कुठे अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन सुरु झाली होती मात्र…”, अमोल मिटकरींचा टोला