आशिष शेलार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “ते मोठे नेते आहेत, त्यांच्याशी…”
मुंबई : एका कार्यक्रमात बोलत असतांना भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सकाळचा शपथविधी होण्याआधीच दोन वर्षापूर्वी २०१७ मध्येच भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात युतीची चर्चा झाली होती, अशी गोपनीय माहिती बोलून दाखवली. आशिष शेलार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, आशिष शेलारांच्या टीकेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार म्हणाले की,‘आशिष शेलार हे मोठे नेते आहेत, त्यांच्याशी पवार साहेब थेट बोलले असतील,’ तसेच २०१७ ला काय झाले होते यापेक्षा आत्ता जनतेसमोर काय प्रश्न आहे, समस्या काय आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, ‘२०१७ सालीच राष्ट्रवादीसोबत युती करावं असं वाटत होतं. शिवसेनेची वारंवार मिळणारी धमकी, खिशात राजीनामा घालून फिरत असल्याची वक्तव्ये, याला कंटाळूनच राष्ट्रवादीशी युती करावी असं भाजपनं ठरवलं होतं. २०१७ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यावं आणि सत्ता स्थापन करावी अशी चर्चा झाली होती. भाजपच्या नेतृत्वाने नंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं तीन पक्षाचं सरकार स्थापन करू अशी भूमिका घेतली. पण नंतर राष्ट्रवादीने याला नकार दिला’, असे आशिष शेलार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “…हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही”, अजित पवार यांचे वक्तव्य
- “उत्तर प्रदेशात योगींनी काय करावे, हा त्यांचा अधिकार पण महाराष्ट्रात…”, भोंगे संदर्भात अजित पवारांचे मोठे वक्तव्य
- IPL 2022 GT vs SRH : मुरलीधरनचं असं रुप पाहिलंय का? ‘या’ गोष्टीमुळं रागानं लालबुंद झाला आणि…! पाहा VIDEO
- “MNS ला राष्ट्रवादीची फूस असती तर राज ठाकरेंनी शरद पवारांना…”, अजित पवारांचे मोठे विधान
- “पुण्यात तलवारींचा साठा सापडला, गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा का ?” ; शेलारांचा सवाल