fbpx

आम्ही पक्षात बळजबरी करत नाही, विधानसभा लढण्याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल – अजितदादा

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना सपाटून पराभवाला समोर जाव लागलं आहे. लोकसभेत पराभव झाला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पार्थ पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबद्दल अजित पवार यांना विचारले असता आम्ही पक्षात बळजबरी करत नाही, विधानसभा लढण्याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल, असे उत्तर दिले आहे.

पार्थच्या पराभवामुळे पवार कुटूंबियांना कोणताही धक्का बसला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांच्या पराभवाचे जेवढे दुःख झाले. तेवढेच पार्थच्या पराभवाचे दुःख झाल्याचे अजित पवार म्हणाले. दरम्यान, लोकसभेतील पराभव आम्ही स्वीकारला असून आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे, असंही ते म्हणाले.