जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी आहेत तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या विकासासाठी आम्ही किमान समान कार्यक्रमानुसार काम करण्याचे ठरवलेलं आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही. बाकीच्यांनी बोलून काहीही उपयोग नाही,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अमरावतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील येत्या वर्षांच्या प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी येथील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Loading...

महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी, संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं, अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती. तसेच, शिवसेनेकडून लिहूनही घेतला असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिला होता.

दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या दाव्याचे खंडन केले होते. संविधानाच्या चौकटीतून सरकार चालवण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत आणि तसंच सरकार चालणार आहे. किमान समान कार्यक्रमाशिवाय काहीही लिहून देण्यात आलेलं नाही, असेही शिंदेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...