हा तर राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव; अजित पवार यांच्याकडून संग्राम जगतापांची पाठराखण

अहमदनगर: केडगावचे शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा हत्या प्रकरणाने अहमदनगर तसेच राज्यातील कायदा सुवस्थेचे धिंडवडे काढले जात आहे. त्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याच दिसत आहे. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांना या हत्याकांडात गोवल जात असून त्यांचा हत्येशी काहीही संबंध नाही, हे विरोधकांनी राष्ट्रवादी कांग्रेसच्या बदनामीचे षडयंत्र रचल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी संग्राम जगताप यांची पाठराखण केली आहे.

bagdure

शनिवारी 7 एप्रिल रोजी अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मध्ये पोटनिवडणुकीत पार पडली, मात्र याचवेळी शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची भरदिवसा रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप त्यांचे वडील आमदार अरुण जगताप, संग्राम यांचे सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा संदीप कोतकरसह 50 जणांवर खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना देखील आज सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

You might also like
Comments
Loading...