राजकीय टोलेबाजी करणारे अजित पवारांचे विटी-दांडू खेळतांना टोले फसले

बारामती: तुफान राजकीय टोलेबाजी करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार मैदानात विटी-दांडू खेळले. मात्र विटी-दांडू खेळतांना पवारांचे टोले फसले. पवार यांनी चक्क ६ वेळा विटी दांडूचे टोले लगावले मात्र विटी उडलीच नाही.

bagdure

बारामती येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘एनव्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने ‘मातीतल्या खेळांची जत्रा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटी-दांडू खेळण्याचा आनंद घेतला. अजित पवार यांची मातीतला नेता म्हणून ओळख आहे. याची प्रचिती बारामतीत आली.

You might also like
Comments
Loading...