सुजित मला तुला पारनेरचा आमदार झालेला पहायचं आहे : अजित पवार

स्वप्नील भालेराव / पारनेर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दि. 26 रोजी नगर दौर्यावर आले असताना पक्षाच्या कार्यकत्यांबरोबर हाॅटेल राज पॅलेस येथे आढावा बैठक घेण्यात आली.

याभेटी दरम्यान पारनेर तालुक्यातील बाजार समितीच्या सभापतींवरील अविश्वास ठरावासंदर्भात पक्षाने जे सुजित झावरेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर तात्काळ झावरे हे बारामतीला गेले तेथे शरद पवार यांची भेट घेतली. पवार म्हटले की, आम्ही सर्व या गोष्टींवर चर्चा करू व निर्णय देवू. अशी स्पष्टोक्ती दिली. त्यानंतर अजित पवार दि. 26 रोजी नगर दौर्यावर होते या दौऱ्यात सुजित झावरे पाटील व त्यांच्या आई सुप्रियाताई झावरे यांची अजित पवार यांच्या समवेत नगर येथील राज पॅलेस हाॅटेल मध्ये साधारण अर्धातास बैठक झाली व या बैठकीतून जेव्हा सुजित झावरे बाहेर आले तेव्हा चेहर्यावर एक मिश्किल हास्यमुद्रा पहायला मिळाली. नेमक या मागच कारण काय ? हा प्रश्न सर्व उपस्थितांना पडला.

जेव्हा बैठकी झाल्यानंतर झावरे सोशल मिडीयावर बोलले तेव्हा त्यांनी अस जाहीर केल की ,
मी व दादा यांच्या उपस्थित बाजार समितीच्या मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा झालेली आहे. यावर दादांनी मला पक्षसंघटन वाढवण्याचा सल्लाही दिलाय. तसेच सुजित तु मला पारनेरचा आमदार झालेला पहायचाय ही माझी इच्छा आहे. आणि याच विधानावरून झावरेंचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला वाटला.

याच पाश्र्वभूमीवर पुण्यात दि. 27 रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय देतील तो मला मान्य असेल असही मत झावरेंनी मांडल यावर पक्षप्रमुख नेमकी कोणती भुमिका बजावणार याकडे तमाम पारनेर तालुक्यातील झावरे समर्थकांचे लक्ष आहे.