fbpx

शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार : अजित पवार

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र सध्या लोकसभा उमेदवारीबद्दल कोणतीही चर्चा नको, असंही त्यांनी सांगितलं. तसंच आगामी निवडणुकांसाठी ‘एक बूथ आणि २५ यूथ’ अशी व्यूहरचना करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच त्यांना कळत नाही. शिवसेना बावचळून गेल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फकीर आहेत. त्यांना संसारी माणसांचं दु:ख कळत नाही. म्हणूनच ते करतात एक आणि वागतात वेगळं,’ असा चिमटा काढतानाच केंद्र सरकारने केलेली नोटाबंदी पूर्णपणे फसल्याचा पुनरुच्चारही पवार यांनी केला.

पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर सामान्य कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार? :पवार

लालू-नितीश कुमार,मायावती- मुलायम हे एकत्र येऊ शकतात, तर शिवसेना आणि भाजप का नाही ?