‘मराठा समाजातील तरुणाचा संयम संपतोय ; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो’

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाने शांततेने मूक मोर्चे काढले त्यामुळे त्यांचे जगभर कौतुकही झाले. परंतू आता या समाजातील तरुण वर्गाचा संयम सुटत आला आहे. एकादशीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मराठा आरक्षणावरील स्थगन प्रस्तावावर बोलताना केली.

मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीत सुरुवात

दरम्यान, मध्यंतरी मराठा समाजाने तुळजाभवानीच्या मंदिरात गोंधळ घालून आरक्षण देण्याची मागणी केली होती आणि आता या समाजाने आषाढी एकादशीला शासकीय पुजेच्या वेळी आरक्षणाची मागणी करणारे आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यासाठी स्थगन प्रस्तावावर सभागृहात चर्चा व्हायला हवी अशी मागणीही अजित पवारांनी केली.

आघाडीच निमंत्रण आल्यावर बघू; महाआघाडीसाठी राज ठाकरेंच ‘वेट अँड वॉच’