Ajit Pawar- कर्जमाफी केल्याशिवाय मंत्र्यांना मतदारसंघात फिरु देणार नाही- अजित पवार

वेळोवेळी कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात मागणी करूनही सरकार बहिरेपणाचे व झोपेचे सोंग घेत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आणण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय मंत्र्यांना मतदारसंघात फिरु देणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला. कर्ज माफीसाठी या ‘बश्या’ बैल सरकारला रूमण्याचा हिसका दाखवा, असे खास ग्रामीण शैलीत त्यांनी आवाहन केले.

मुक्ताईनगर, अमळनेर, शिरपूरसह इतर ठिकाणच्या  सभांमध्ये अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.  शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने काहीच केलेले नाही. ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. कांद्याला एक रूपया अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना तुम्ही भिकारी समजलात काय, अजून किती काळ तुम्ही शांत बसणार आहात, आता पेटून उठण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही पवार यांनी केले.