fbpx

मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असतानाच ट्विटरवर कशा काय पोस्ट पडत होत्या?

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (मंगळवार) विधानसभेत सादर करण्यात आला. वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सन २०१९-२० चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. मात्र विरोधकांकडून सरकारनेच हा अर्थसंकल्प फोडल्याचा आरोप करायला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. आजपर्यंत कधीही अर्थसंकल्प फुटलेला नव्हता. अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याआधीच फुटला, मुनगंटीवर सभागृहात अर्थसंकल्प मांडत असतानाच ट्विटर अर्थसंकल्पाच्या पोस्ट पडत होत्या. इकडे अर्थसंकल्प मांडत आहेत, मग ट्विटरवर कशा काय पोस्ट पडत होत्या, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे.