फडणवीस यांना फडण दोन शुन्य तर ऊर्जामंत्री बावणकुळे यांना पन्नास दोन कुळे असं म्हणायचं का?

blank

टीम महाराष्ट्र देशा- बालभारतीच्या इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात नवे बदल करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात. २१ ते ९९ हे आकडे आता यापुढे जोडाक्षराप्रमाणे नाही, तर संख्यावाचनाप्रमाणे शिक्षकांनी शिकवायचे आहेत. म्हणजेच ३२ या आकड्याचा थेट बत्तीस असा उल्लेख न करता ‘तीस दोन’ असा उल्लेख करावा लागेल. यावरुन विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे.

दरम्यान या बदलाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोध दर्शवला आहे. हा बदल रद्द करण्यासाठी नवे राज्य शिक्षण मंत्री आशिश शेलार यांनी आदेश द्यावा असेही अजित पवार यांनी विधानसभेत म्हटले. तर अजित पवार यांनी या बदलाचे उदाहरण देतान, ऊर्जीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा दाखल देत खिल्लीदेखील उडवली आहे.गणिताच्या संख्यावाचनात केलेल्या बदलानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांना फडण दो शुन्य तर ऊर्जामंत्री बावणकुळे यांना पन्नास दोन कुळे असं म्हणायचं का असा मिश्कील प्रश्न उपस्थित केला. मात्र, गमतीचा भाग सोडून देत हा बदल स्विकाहार्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, हा बदल रद्द करण्याची मागणी नवीन शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान याच मुद्द्यावरून मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. अगोदर ‘फडणवीस’ असं म्हटलं जायचं. आता झालेल्या गणिताच्या बदलानुसार ‘फडण दोन शून्य’असं म्हटलं जाईल असं म्हटलं आहे .