सातत्यपूर्ण यशासाठी अधिक मेहनत घ्या- अजित पवार

पुणे : पुरूष कबड्डी संघाने 11 वर्षांनंतर महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्‍यपद मिळवून दिले आहे. या संघातील खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे, व्यवस्थापकांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. हे यश यापुढील काळातही कायम राखण्यासाठी खेळाडूंनी आणि संघटनेतील पदाधिका-यांनी अधिक मेहनत घ्यावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

हैदराबाद येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटामध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेतर्फे विजेत्या संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना तसेच आशियाई कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूंनाही या वेळी प्रत्येकी 51 हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या वेळी आपले विचार मांडताना अजित पवार म्हणाले,राज्याच्या क्रीडा क्षेत्राचा विचार करता नव्या वर्ऱ्षाचा प्रारंभ जोरात झाला. तब्बल 11 वर्षांनंतर आपल्या कबड्डीपटूंनी विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. पुरूषांच्या संघाने मिळवलेले हे यश राज्यातील कबड्डीला नवी उर्जा देणारे आहे. यश मिळविण्यापेक्षा ते टिकविणे अवघड असते. या यशामध्ये सातत्य राखण्यासाठी मेहनतीबरोबरच पारदर्शकता आवश्‍यक आहे. खेळाडूंबरोबरच पदाधिका-यांनीही यादृष्टीने गंभीरपणे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. क

बड्डी लीगमुळे खेळाडूंना लोकप्रियता तसेच आर्थिक संपन्नता लाभली आहे. ही आनंदाची गोष्ट असली तरी कबड्डी या खेळाचा मूळ गाभा आणि खेळाडूंचे आरोग्य याला धक्का लागता कामा नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे. खेळाडू स्टेरॉईड्‌सपासून दूर राहतील, यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे.बुवा साळवी यांनी कबड्डीच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात केले. नंतर शरद पवार यांनी कबड्डीला प्रतिष्ठा मिळवून दिली.

अनेकांच्या मेहनतीमुळे ही खेळ देशाच्या कानाकोप-यात तसेच सातासमुद्रापार गेला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला राष्ट्रीय विजेतेपद हुलकावणी देत होते. अखेर 11 वर्षांनंतर पुरूष संघाने महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले आहे. आता महिलांनीही राष्ट्रीय विजेतेपद खेचून आणावे, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली.

You might also like
Comments
Loading...