‘मी अजित अनंतराव पवार, काटेवाडीचा बूथ प्रमुख…’

ajit pawar

पुणे : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षाला जास्तीत जास्त मतदान व्हावे याकरिता बूथ स्तरावर पक्ष मजबूत असावा असा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा आग्रह असतो. आज पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पवार यांनी याच गोष्टीवर भर दिला. पक्षाच्या आदेशानुसार सर्वानी बूथ याद्या कराव्यात असे सांगत ते पुढे म्हणाले की,मी अजित अनंतराव पवार काटेवाडीचा बूथ प्रमुख आहे.माझ्याकडे देखील यादी आहे.त्यामुळे प्रत्येकाने पक्ष बांधणीवर लक्ष द्यावे असे आदेश पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यलयाच्या सभागृहात बैठक पार पडली.त्यावेळी अजित पवार हे बोलत होते.यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण,प्रवक्ते अंकुश काकडे,शहर अध्यक्ष चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की,केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यँत अनेक योजना पोहचवत आहे.भाजपला सोशल मीडियावर देखील कार्यकर्त्यांनी उत्तर दिले पाहिजे.ही सध्याची परिस्थिती लक्षात घेता.त्यावर अधिक खूप काम करावे लागणार आहे.

भाजप सरकार सर्व सामान्यांच्या दृष्टीने निर्णय घेताना दिसत नाही.ते केवळ उद्योगपतीचे सरकार असून सर्व सामान्य नागरिकाचे महागाई ने कंबरडे मोडले आहे.त्या प्रश्नावर संघटनेतील प्रत्येकाने आवाज उठवण्याची गरज आहे.त्यामुळे या सरकारचा कारभार आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला दाखवावे.तसेच भाजप आणि शिवसेना या जातीवादी पक्षाला बाजूला करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

दीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार

चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्याचं पटवून दिलं तरच सत्तांतर घडून येईल : पवार