हसण्यासारखं वागावं म्हटलं तर तुम्ही म्हणाल याला काय वेड लागलंय का? : अजित पवार

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा- आगामी काळात निवडणूकांना सामोरे जाताना प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्याने हसून व उत्साहानेच मतदारांचे स्वागत करा, त्याने मतदारांनाही बरं वाटत.कार्यकर्त्यांनी फोटो देताना हसरे राहायला हवे, कपाळावर आठ्या पडलेला माणूस कोणालाच आवडत नाही त्यामुळे तुमचा चेहरा छान हसरा असेल तर मतदारांनाही ते बरे वाटेल असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बूथकमिटी कार्यकर्त्यांना बारामतीत बोलताना दिला आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?
मतदान केंद्रावर येणा-या प्रत्येक मतदाराचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने हसूनच स्वागत करायला हवे. कार्यकर्ता हसला तरच मतदारांनीही जरा समाधान वाटते. हल्ली मीही हसण्याचा मनापासून प्रयत्न करतोय, पण हसूच येत नाही. हसण्यासारख काही करावं तर तुम्ही म्हणाल याला काय वेड लागलय का?

सुप्रिया सुळे यांनी तारिक अन्वर यांना विचारला ‘हा’ मार्मिक सवाल