निलेश लंके राष्ट्रवादीच्या वाटेवर ? अजित पवारांची घेतली भेट

टीम महाराष्ट्र देशा : सध्या सोशल मिडीयावर पारनेरचे भावी आमदार पदाचे दावेदार, निलेश लंके व अजित पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीचा फोटो चांगलाच व्हायरल झाल्याने, राजकीय चर्चेला चांगलच उधाण पारनेर तालुक्यात पहायला मिळत आहे. यामुळे सुजित झावरे समर्थकांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. तर इकडे शिवसेनेचे आमदार विजयराव औटी यांनी सावधानतेचा पवित्रा घेतल्याच दिसतय.

दरम्यान, लंके म्हणाले की माझे व्यक्तीगत मित्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती चे माजी सभापती प्रशांत शिरोळे यांच्या निवासस्थानी गेलो असता तेथे अजित पवार ही आले होते .व आम्ही शेजारीच बसलो होतो मात्र आमच्या तशा कोणत्याही राजकीय चर्चा अथवा पक्ष प्रवेशाबाबतचा कोणताही निर्णय घेतला नसल्याने, कोणीतरी माझ्या फोटो चा गैरवापर करून उगाच उलटसुलट चर्चेला उधाण आणत आहेत. असेही लंके यावेळी म्हटले.
मात्र सदर व्हायरल होत असलेल्या फोटो वरून लंके आता राष्ट्रवादीत नक्की प्रवेश करणार अशी चर्चा मात्र गावागावात सुरू आहे.

 

मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही ?