कुणा एकाचं कुंकू लावा ; सतरा जणांचं लावू नका ! -अजित पवार

ajit pawar

टिम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे टिकात्मक तोफ डागत आहेत. ‘कुणा एकाचं कुंकू लावा, सतरा जणांचं कुंकू लावू नका! ‘ अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले. कांदळी येथे झालेल्या जुन्नर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

अजित पवारांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

Loading...

●शेतमालाची अवस्था बेकार झाली आहे. शेतकऱ्यांची अवस्था पहा आणि मग बोला. मुंबईत राहून बोलू नका.
●बुलेट ट्रेन ची गरज नाही. पुणे-नाशिक ट्रेन केली तर जुन्नर आंबेगाव ला फायदा तरी होईल. तुमच्या खासदाराने 3/3 वेळा निवडून येऊन काहीही केलं नाही.
●उसाला दर देण्यासाठी पवार साहेबांनी सूत्र ठरवले होते. मात्र केंद्र व राज्य सरकार लक्ष घालत नाही.
●पाशा पटेल, सदा खोत पवार साहेबांवर काहीही बरळतात.
●मंत्रीमंडळात पश्चिम महाराष्ट्रतील प्रश्न मांडणारा एकही नेता नाही. बापट काय करतात त्यांचं त्यांनाच माहीत.
●कितीही बातम्या आल्या तरी भाजप-शिवसेनेवाले एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यांना माहीत आहे स्वतंत्र लढले तर घरीच जातील.
●शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार राष्ट्रवादीचा झाला पाहिजे.
●काही जण दुटप्पी बोलतात आणि करतात. आमच्या पक्षाची विचारधारा पटत नसेल तुमची वाट मोकळी आहेत.
●कुणा एकाचं कुंकू लावा. सतरा जणांचं नका कुंकू लावू

यावेळी दिलीप वळसे पाटील,विश्वासनाना देवकाते, जालिंदरभाऊ कामठे, जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्षा वैशालीताई नागवडे, अतुल बेनके,  आंबेगाव बाजार समिती सभापती देवदत्त निकम, पाडुरंग पवार, शरदराव लेंडे आदींची उपस्थिती होती.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील