वर्धा : जिथे जीवीतहानी झाली, तिथे चार लाखांची मदत मिळाली आहे. मात्र जनावरे मृत्यूमुखी पडली त्याचे पैसे मिळालेले नाहीत. वर्ध्यात अजुनही सर्व पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्याशिवाय मदतही मिळणार नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. पाऊस सुरू आहे म्हणून शेतकरी इतके दिवस थांबला. पण आता थांबण्याची त्याची तयारी नाही. ही बाब मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्षात घेऊन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आज वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या भागातील परिस्थिती माध्यमांसमोर मांडली.
अजित पवार यांनी विदर्भ दौरा सुरु केल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी टीका केली. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या राखणाऱ्यांना काय कळणार की शेतात काय अडचणी आहेत? इथे फिल्डवर उतरून बघावं लागतं. विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडतोय. हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना आधी मदत द्या.”
शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करुन द्यावे-
आज अजित पवारांनी वर्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके आणि तिथून वाहणाऱ्या नद्या, ओढे यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील १२ ते १५ दिवस पाऊस असल्यामुळे शेतमजुरांना कामाला जाता आले नाही. त्यामुळे त्यांचे उपजिविकेचे साधन थांबले. या सर्व परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर वस्तुस्थिती मांडणार आहोत. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी हरभरा, तुरीचे बियाणे उपलब्ध करुन दिले पाहीजे, ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी सचिवांनी शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करावा-
तसेच कापूस आणि सोयाबिनची वाढ खुंटली आहे. कापूस आणि सोयाबिन ही या भागातील महत्त्वाचे पिके आहेत. त्यामुळे या पिकांना हेक्टरी भरीव मदत देणे गरजेचे आहे. खरीपाच्या पेरणीचा हंगाम आता निघून गेला. रब्बीला अजून वेळ आहे. त्यामुळे आता पुन्हा पेरणी केली तर ती धड खरीपात मोडणार नाही आणि धड रब्बीतही मोडणार नाही. त्यामुळे चारही कृषी विद्यापीठे, कृषी आयुक्तांनी, कृषी सचिवांनी आता यात लक्ष घालून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करावा, असे अजित पवार यांनी सूचविले.
महत्वाच्या बातम्या :
- Aaditya Thackeray | अजाणचा आवाज ऐकताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण; व्हिडीओ व्हायरल
- Navneet Rana | नवनीत राणांचा जीव धोक्यात! राजस्थान सीमेवरून आलेल्या लोकांनी केली घराची रेकी
- ambadas danve । महाराष्ट्राला लाभले दिल्लीत मुजरा करणारे मुख्यमंत्री – अंबादास दानवे
- Suresh Navale | “अर्जुन खोतकर ३१ तारखेला शिंदे गटात प्रवेश करणार”; सुरेश नवले यांचा खुलासा
- Sanjay Raut । माझ्यावर कितीही दबाव आला तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेने सोबतच राहणार – संजय राऊत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<