खडसेंच्या पक्षप्रवेशावर अजित पवारांनी सोडले मौन, म्हणाले…

khadase and ajit pawar

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत.

नुकताच एकनाथ खडसे यांनी अचानक मुंबई दौरा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील मुंबईत असल्याने त्यांची भेट होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भेट न घेताच खडसे मुक्ताईनगरला परतले. अशातच, माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला होता. ‘घटस्थापनेच्या मुहूर्तावर आमचे नेते व मार्गदर्शक एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील’ असे विधान त्यांनी केले होते.

आता, राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ‘ राजकारणात अनेक भेटीगाठी होत असतात. भाजपाचं सरकार असताना आम्हीही लोकप्रतिनिधीच्या नात्याने अनेकदा भेटी घेतल्या होत्या. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काहीही माहिती नाहीये. जितकी माहिती माझ्याकडे होती ती मी तुम्हाला दिलीये.’ असं सावध वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:-