तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा

पुणे : निवडणुकीत गद्दारी केल्यास याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या बिनधास्त टोलेबाजी केली.

निळकंठेश्वर पॅनलसाठी आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, “तुम्ही कामांसाठी थेट प्लॅन आणि इस्टिमेट काढून या. उपमुख्यमंत्री झाल्यापासून मी नदी पात्र दुरुस्तीच्या काम स्वतः जाऊन पाहत आहे. कामासाठी निधी देईल मात्र स्थानिक पातळीवर कामाला विरोधकरू नका. कामाच्या बाबतीत पाठपुरावा करण्यास तुम्ही कमी पडू नका. मी उपमुख्यमंत्री असेपर्यंत सर्वात जास्त विकास करणार आहे. असं केलं नाही, तर पवारांची औलद सांगणार नाही.” असेही ते यावेळी म्हणाले,

Loading...

तसेच राजकारणात अनेक चढ उतार असतात. मात्र, जनतेचं आमच्यावर प्रेम आहे. मी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे. अर्थसंकल्प सादर करताना सामान्य माणूस केंद्रस्थानी असेल. महात्मा फुले कर्जमाफी योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत बसणाऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. तर पुढच्या टप्प्यात 2 लाखावरील कर्ज असणाऱ्यांपैकी जे नियमाने कर्जफेड करत आहेत त्यांची कर्जमाफी करणार आहे, असंही आश्वासन अजित पवार यांनी दिलं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....