‘अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते कामाला वाघ आहेत’

पुणे : लोकमत पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमात खा. संजय राऊत यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी दिलखुलासपणे अनेक विषयांवर भाष्य केलं. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते.

या मुलाखतीच्या शेवटी राऊत यांना काही नेत्यांची नावं विचारण्यात आली. या नेत्यांचं वर्णन कसा कराल आणि त्यांना काय सल्ला द्याल, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी नेत्यांचं कौतुक तर केलंच पण मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला. उद्धव ठाकरे हे निष्कपट व्यक्तिमत्त्व आहे. आता आपण मुख्यमंत्री आहात. त्यामुळे कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे असं राऊत म्हणाले.

Loading...

अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते कामाला वाघ आहेत. निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता आहे. हिंमतीने काम करणारा माणूस. तोंड खराब आहे. ते त्यांनी तसंच ठेवावं असा सल्ला त्यांनी दिला.

राज ठाकरे हे उत्तम कलावंत माणूस आहेत. उत्तम व्यंगचित्रकार. राज ठाकरे नेतेसुद्धा आहे. पण त्यांच्यातली व्यंगचित्रकला संपत चाललीय. राज ठाकरेंनी अधूनमधून ब्रश घेऊन फटकारे मारले पाहिजेत असा सल्ला त्यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज अन्य कुठलाच नेता नाही. ते सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी जगात देशाची प्रतिमा निर्माण केली आहे, अशी स्तुतिसुमनं उधळली. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचा ‘प्रखर राष्ट्रभक्त’ म्हणून गौरव करत त्यांनी मोदी सरकारच्या धडाकेबाज निर्णयांचं स्वागतच केलं आहे.

भाजपाला मदत होईल असं कोणतंही कृत्य त्यांनी करू नये असा सल्ला त्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दिला. तर असदुद्दीन ओवेसी यांना उत्तम कायदेपंडित घोषित करत स्तुतीसुमने उधळली.पुढे बोलताना त्यांनी ओवेसी यांना स्वत:ची भूमिका पटवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. पण त्यांनी व्होट कटिंग मशीनची प्रतिमा बदलायली हवी असा सल्ला दिला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण