अजित पवार राष्ट्रवादी काबिज करण्याच्या तयारीत : मोदी

blank

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये गृहकलह सुरू असून अजित पवार पक्ष काबिज करण्याच्या तयारीत असल्याचा गौैप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदी यांनी आज वर्ध्यातून लोकसभेच्या प्रचाराला सुरूवात केली. या प्रचारसभेत ते बोलत होते. सभेत मोदीं यांनी राष्ट्रवादीसह काँग्रेसवरही टीकेची तोफ डागली.

कॉंग्रेसच्या सत्ताकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण त्यांनी लक्ष दिले नाही. आज शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणारे शरद पवार यांनी मावळात शेतकरी हक्क मागत असताना त्यांना गोळ्या घातल्या. तसेच महाराष्ट्रातील असणारे शरद पवार हे केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री होते, मात्र तरीही राज्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्या नाहीत. पण भाजप ने ती अपूर्ण काम पूर्ण केली असा दावा त्यांनी केला.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी म्हणजे कुंभकर्णाची झोप आहे. हा कुंभकर्ण सत्ता मिळाल्या नंतर झोपी जातो आणि सहा महिन्यांनी जाग आल्यावर जनतेचे पैसे खाऊन पुन्हा झोपी जातो. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कॉंग्रेस आघाडीला लक्ष केले.