‘अजित पवार मराठ्यांचा घात करताहेत’, संभाजी ब्रिगेडचा आरोप

अजित पवार

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला असला तरी या समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. गरज भासल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेऊ, अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. काहीही झाले तरी आमचे सरकार मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही पवार म्हणाले होते.

यावर मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास टाळाटाळ करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचा घात करत आहेत, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.

‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे सांगितले जाते. या समाजाला पुन्हा एकदा मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. यातून काहीच साध्य होणार नाही. वेळेचा अपव्यय होईल. गोरगरिबांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे गायकवाड आयोग स्वीकारून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, जे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे त्याकडे दुर्लक्ष करून केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही,’ असे खेडेकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP