मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. दिवसेंदिवस महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. खासदार संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस मिळाली आहे. जमीन घोटाळाप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना उद्या अर्थातच २८ जून रोजी चौकशीला जावे लागणार आहे. तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवार यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं अजित पवार ट्विटमध्ये म्हणाले.
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022
अजित पवार यांनी काल कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर आज सोमवारी पवारांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. तसेच संपर्कात असलेल्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला देखील पवारांनी दिला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरं होऊन राज्यपाल नुकतेच परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<