पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी पुन्हा’ यशस्वी करण्यासाठी खुद्द अजित पवार मैदानात !

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी पुन्हा’ यशस्वी करण्यासाठी खुद्द अजित पवार मैदानात !

ajit pawar

पुणे : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महत्वाच्या महापालिका या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत लोकसभा निवडणुकांसह विधानसभा निवडणुकांमध्ये देखील पुणे जिल्ह्यात भाजपने घवघवीत यश मिळवलं होतं. यानंतर २०१७ साली झालेल्या पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसचा मोठा गट भाजपकडे गेला.

२०१७ साली भाजपने दोन्ही महापालिकांमध्ये एकहाती सत्ता मिळवली. आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली असून या दोन्ही महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी अजित पवार यांनी खास लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने राष्ट्रवादी कडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. तर भाजपने देखील सत्ता कायम राखण्यासाठी दंड थोपटले आहेत.

दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी नेतृत्व स्वतः करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढली जाईल. एवढंच नाही तर पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत, असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे.

‘पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. पुण्यातील काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, मी त्यांना सांगितलंय ते अपात्र नाही झाले पाहिजेत. तसं झाल्यास ते ६ वर्षांसाठी अपात्र होतात,’ असं विधान अजित पवार यांनी केलं. दरम्यान, भाजपसाठी हि धोक्याची घंटा आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असल्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये हे समीकरण कायम राहणार कि स्वबळाचा नारा आघाडीतील पक्ष देणार याबाबत अजून कोणतीही स्पष्टता झालेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या