fbpx

अजित दादांमधील माणुसकीचे दर्शन, रस्त्यावर पडलेल्या जखमीला दिला मदतीचा हात

सातारा: अजित पवार यांना सर्वजण एक कडक आणि तापट स्वभावाचा नेता म्हणून ओळखतात. मात्र, त्यांच्याजवळ असणारे लोक त्यांच्या प्रेमळ आणि मदतीला धावणाऱ्या स्वभावाचे गोडवे देखील गातात. आज अजित दादांमधील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे.

रानडुक्कराने धडक दिल्याने दुचाकीवरून पडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देत अजित पवार यांनी स्वतःच्या गाडीतून त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केले. या घटनेचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

झाल अस की, अजित पवार हे महाबळेश्वर वरुन विवाहसोहळा आटोपून निघाले होते. यावेळी महाबळेश्वर- सातारा रस्त्यावर बिबवी गावातील संतोष जाधव हे रानडुक्कराने धडक दिल्याने घसरून पडले. रस्त्यावर जोरदार पडल्याने ते बेशुद्ध झाले. याचवेळी तेथून जाणारे अजित दादा यांना हे लक्षात आले. लागलीच त्यांनी गाडी थांबवत. बेशुद्ध असणाऱ्या जाधव यांना आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सातारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच स्वतः फोनकरून डॉक्टरांना जखमीच्या तब्येतीची खबरदारी घेण्याची सूचना केली.