खबरदार हलगर्जीपणा केला तर, अजितदादांनी खासगी रुग्णालयांना भरला दम

ajit pawar

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांना सज्जड दम भरला असून हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. करोनासारख्या संकटकाळात काही खासगी रुग्णालयांकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर असून रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी असा आदेशही अजित पवार यांनी दिला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लॉॉकडाउनसंदर्भातील नियम, केंद्र आणि राज्य सरकारकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचना, तसंच पुणे जिल्हा व शहरातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षेचं नियोजन करावं,” असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

आपण जे बोलतो ते करतो का, याचा विचार करा; ठाकरेंना फडणवीसांचा टोला

“उद्योगांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी उद्योग-व्यवसाय सुरु करून जनजीवन सुरळीत करणं गरजेचं आहे. सोबतच स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात येणं आणि यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं,” अजित पवार यांनी सांगितलं आहे.

तर, अजित पवार यांनी यावेळी रुग्णालयांशी समन्वय साधण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावा असा आदेशही दिला आहे. “करोनाचा प्रादुर्भाव टाळणे आणि अर्थचक्राला गती आणणे, हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी करोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे. नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसत आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाया नियमितपणे करुन शिस्त निर्माण करणं गरजेचं आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयातून यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

संकटात आई सारखी कंबर कसून तुम्ही प्रजेसाठी उभे रहा, ७० वर्षांच्या आजीबाईंची अजितदादांकडून अपेक्षा