उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अजित पवारांना अधिकार नाही; किरीट सोमय्यांचा घणाघात

उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अजित पवारांना अधिकार नाही; किरीट सोमय्यांचा घणाघात

पुणे : पवार कुटुंबियांच्या ५७ कंपन्यापर्यंत आमची टीम पोहोचली आहे. या कंपन्यात या कुटुंबाची बेनामी मालमत्ता आहे. अजित पवार आणि कुटुंबियावर आयकर विभागाची सुरु असलेली कारवाई भारतातील सर्वात मोठी कारवाई आहे असे किरीट सोमय्या म्हणाले.

अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते.अजित पवार यांच्या बहिणींच्या घरीसुद्धा छापे टाकण्यात आले होते. या छाप्या नंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे यातच आज सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

सोमय्या म्हणाले , अजित पवार आणि पवार कुटुंबियांचा हिशोब मी मांडणार आहे जरंडेश्वर आणि इतर कारखाने या मध्ये कोण कोण भागीदार आहे ते मी सांगणार आहे. कारखान्याच्या व्यवहारात अजित पवारांनी सर्व नियमांचं उल्लंघन केलंय, त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही असं सोमय्या यांनी म्हटलंय. तसेच या कारखान्यातील घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याचंही सोमय्या यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या