मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. 33 दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार न केल्याने अजितदादांनी या दोन्ही नेत्यांची भर पत्रकार परिषदेत खिल्ली उडवली आहे.
मी फडणवीसांचं स्टेटमेंट ऐकलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी त्यांच्या मोठ्या बैठकीत त्यांनी चर्चा केली. आढावा घेतला. तुम्ही विचार करा. त्या कॅबिनेटमध्ये 45 खुर्च्या असतात. बाकीच्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, ते काय करतात हे पाहत असतात. त्यामुळे त्यांच्यावर रिकाम्या खुर्च्यांचं टेन्शन असतं. आपण दोघांनी काही चुकीचं करू नये बरं. काही चुकीचं करू नये बरं, असं ते या रिकाम्या खुर्च्यांना पाहून म्हणत असतात, अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली.
महत्वाच्या बातम्या :
- Shahjibapu Patil । आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय?, शहाजी बापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल
- Uday Samant | “जनता मुख्यमंत्र्यांना समर्थन देते त्यामुळे…” ; उदय सामंत यांची प्रतिक्रिया!
- Subodh Bhave | “नालायक राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम”; सुबोध भावेचा घणाघात
- Subodh Bhave | “लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे”; सुबोध भावे याची टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<