…ती धमक आताच्या सरकारमध्ये नाही- अजित पवार

अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा- भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याला कमरेखाली गोळ्या घालण्याचे वक्तव्य केले होते. अशा सत्तांध सत्ताधाऱ्यांना उलथून टाकेपर्यंत हे आंदोलन वाढत जाईल. सत्ता असो किंवा नसो, काम करत राहायचे, ही राष्ट्रवादी पक्षाची भावना आहे.

आघाडी सरकारच्या काळात दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशी अनेक नैसर्गिक संकटे आली. संकटात सापडलेल्या लोकांना पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी आम्ही पेलली. ती धमक आताच्या सरकारमध्ये नाही. पण आज राज्यातील शेतकरीच आम्हाला सरकारला धारेवर धरा अशी मागणी करत आहे. असे वक्तव्य अजित पवारांनी हल्लाबोल आंदोलनात केलं.Loading…
Loading...