सातारा : सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यामुळे भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. यासह विविध अनिष्ट रुढी परंपरांबाबत त्यांनी जनजागृतीही केली. आज सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची आज जयंती.
यानिमित्ताने सर्व स्तरावर सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच राज्यातील जनतेला ‘महिला शिक्षण दिना’च्या शुभेच्छा दिल्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव (जि.सातारा) येथील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांचे अभिवादन. राज्यातील जनतेला ‘महिला शिक्षण दिना’च्या उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/hsR9Bghf9r
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 3, 2022
सावित्रीबाई फुले या समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशा वेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल, यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय?
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना “भारतरत्न” मिळाला पाहिजे- रुपली पाटील ठोंबरे
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<