Share

Ajit Pawar | अजित पवारांना ‘या’ आजाराचा संसर्ग, पुणे दौरा देखील केला रद्द

Ajit Pawar | मुंबई : राज्यातील परतिच्या पावसाने अनेक नुकसान होत आहे. याचा सर्वात जास्त फटका बसला तो म्हणजे पुणे शहराला. यावेळी अनेकांना परतिच्या पावसामुळे खोकला, ताप, सर्दी सारख्या इंफेक्शने झोडपलं आहे. याचाच शिकार बनले ते राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar).

अजित पवार यांना व्हायरल इन्फेक्शनचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी पुणे दौरा देखील रद्द केला आहे. ‘क्रीडाविश्वाचा आधारस्तंभ’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन समारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते होणार होता.

दरम्यान, सातत्याने राज्यभर प्रवास झाल्याने आणि प्रवासामुळे अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी खोकला झाल्याने अजित पवार यांनी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

दरम्यान, परतीचा पाऊस लांबल्याने सर्दी खोकल्याच्या आजारात वाढ झेलेली पाहायला मिळत आहे. शहरात मोठ्या प्रमाणत व्हायरल इन्फेक्शनचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना सर्दी खोकल्याचा आजार होत आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | मुंबई : राज्यातील परतिच्या पावसाने अनेक नुकसान होत आहे. याचा सर्वात जास्त फटका बसला तो म्हणजे पुणे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics