Ajit Pawar | मुंबई : सोमवारी पुणे शहरात पावसाने प्रचंड थैमान घातला. गाड्या वाहून गेल्या अनेकांच्या झोप उडाल्या. शहरातील लोकांची चांगलीच तारंबळ उडाली असून अनेक कुटुंब पावसाच्या पाण्यात अडकले होते. पुण्यातील काही विशेष ठिकाणी तर पवसाचा मोठा फटका बसला असून याचा परिणाम पुणे मनपा येथे देखील झाला आहे. यावरुन राष्ट्रवादी पक्षाचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) पक्षावर संताप व्यक्त केला आहे.
अजित पवार यांची प्रतिक्रिया –
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते, लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे, मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, असा घणाघात त्यांनी केला आहे.
तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे, असं देखील पवार म्हणाले आहेत. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सोमवारी झालेल्या या पावसात अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या, शहरात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी झाडं देखील पडली आहे. रसत्यांवरील पाण्यामुळे एसट्या देखील ठप्प झाल्या. ज्यामुळे अनेक प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला. कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी सात नागरिक पाण्यामधे अडकले होते. मंगळवार पेठेतील स्वरुपवर्धिनीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटुंब पाण्यात अडकले होते.
कोंढव्यातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसर, बिबवेवाडी-सुखसागरनगर भागातील अंबामाता मंदिर, कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्ता परिसरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनांची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तातडीने तेथे धाव घेत एकूण १२ जणांची सुटका केली आहे.
दरम्यान, नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात जोरदार पाऊस झाला. तसेच बिबवेवाडी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shahajibapu Patil | “संजय राऊत नारादमुनी, तरुंगातून सुद्धा…”, शहाजीबापू पुन्हा बरसले
- New SUV Jeep Launch | भारतात ‘ही’ Jeep SUV होणार पुढच्या महिन्यात लाँच
- NCP | “शिवसेनेनंतर आता भाजपचा डाव राष्ट्रवादी फोडण्याचा”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा धक्कादायक आरोप
- Upcoming Electric Bike | भारतात पुढच्या महिन्यात लाँच होणार ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक
- Diwali 2022 | दिवाळी लक्ष्मी पूजा झाल्यानंतर रात्रभर दिवा का लावावा? जाणून घ्या