औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शहरात आज (२६ एप्रिल) मराठवाड्यातील शाळेच्या ग्रंथालयांना पुस्तक वितरण आणि मुप्टाचे सहावे रौप्य महोत्सवी अधिवेशन पार पडले. दरम्यान, यावेळी बोलत असतांना अजित पवार यांनी मला राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांची भीतीच वाटत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘मला विक्रम काळे यांची भीतीच वाटते, कारण ते भर कार्यक्रमात काय मागेल याचा नेम नाही,’ असे म्हणत पवारांनी यासंदर्भात एक किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले की,‘मागील वर्षी त्यांनी सतीश चव्हाण यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेला बोलावलं होत. परंतु, तेव्हा अचानक काळे यांनी मी तीन टर्म आमदार म्हणून निवडून आलोय मला मंत्री करा’, अशी मागणी केली.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘काळे यांनी फक्त एकट्यासाठी नाही तर सतीश चव्हाण यांच्यासाठी देखील मंत्रिपदाची मागणी केली. तसेच जर फक्त एकालाच मंत्री केलं असत तर तर विक्रम काळेंचा नंबर कटला असता. अशा पद्धतीचा हा आमचा विक्रम काळे आहे,’ असे पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- मंदिरावर भोंगे लावल्यानंतर पोलिसांकडून त्रास, भाजप आमदाराचा आरोप!
- जशास तसं..! नवनीत राणांच्या आरोपांना मुंबई पोलिसांचं ‘चोख’ उत्तर, चहा पितानाचा VIDEO केला ट्वीट!
- IPL 2022 RCB vs RR : बटलरला आवर घालण्यासाठी बंगळुरू सज्ज; वाचा कोणत्या संघाचं पारडं आहे जड!
- “…तर मुंबई सोडून पळून जाल”, निलेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना जोरदार टोला
- सचिनच्या लाडक्या लेकीची ‘नवी’ इनिंग? सारा तेंडुलकरविषयी ‘महत्त्वाची’ बातमी आली समोर!