अजितदादांनी सेनेच्या ‘त्या’ नगरसेवकांना खूप समजावले पण…

ajit pawar

पारनेर : राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरबुर सुरूच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वीच पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता पुढील निवडणुकीच्या तोंडावर बेबनाव झाला असून शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता आणल्यानंतर हे फोडाफोडीच राजकारण पहिल्यांदाच झाले असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्व उत्सुकतेने पाहत आहेत. हे तीन पक्षाचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचं विरोधकांच मत असून, आज बारामती मध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या प्रवेशाने पुन्हा सरकार मध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. तर या कोरोनाच्या महामरी काळात पुन्हा सुरु झालेल्या राजकारणामुळे नक्कीच वेगवेगळे अर्थ उपस्तिथ होत आहेत.

चिंताजनक : राज्यात आज कोरोनाच्या रेकोर्डब्रेक ६५५५ नवीन रुग्णांचे निदान

मात्र आता या पक्षप्रवेशाला अजित पवारांचा साफ नकार असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे ते पाच नगरसेवक राष्ट्रवादीत घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नकारच होता. त्यांची पक्षांतराची भूमीका योग्य नसल्याचे पवार यांनी नगरसेवकांना वारंवार सांगितले, परंतु ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. राष्ट्रवादीत घेतले नाही, तर ते भाजपमध्ये जाणार होते. पारनेरमध्ये भाजपची ताकद वाढू नये, याच उद्देशाने त्यांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय झाला, अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.

त्या नगरसेवकांनी अजितदादांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी नगरसेवकांना समजावून सांगितले. तुम्ही शिवसेनेतच थांबा. तुमच्या प्रभागातील सर्व प्रश्न दोन्ही पक्षांच्या विचारांनी समन्वयाने सोडवू. तुम्हाला राष्ट्रवादीत घेणे योग्य राहणार नाही, तुम्हाला पक्षात घेता येणार नाही, असे निक्षुण सांगितले होते, तथापि, त्या नगरसेवकांनी दादांना विनंती केली. आम्हाला राष्ट्रवादीत घेतले नाही, तरीही आम्ही शिवसेनेत राहणार नाही. आम्हाला तिथे राहणे यापुढे जमणार नाही. त्यामुळे पर्यायाने आम्हाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, असे नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे दादांनी हा निर्णय घेतल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

आनंदाची बातमी : स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी, ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण